सूर तेच छेडीता गीत उमटले नवे
आज लाभले सखी सौख्य जे मला हवे

अबोल प्रीत बहरली, कळी हळूच उमलली
वेदना सुखावली हासली तुझ्यासवे....

[वेदश्री.... धन्यवाद, सविस्तर का लिहिले ते समजून घेतल्याबद्दल. होते असे की, अशा काही गीतांबद्दल कोड्याच्या चाकोरीबाहेर जाऊन लिहिण्याचा उद्देश्य असा होता की, त्या निमित्ताने नव्या पिढीतील धडपडणाऱ्या शिलेदारांचीही ओळख सदस्यांना व्हावी. हल्लीच्या कुटुंब व्यवस्थेत... जीवनात वेगाला आलेले कमालीचे महत्त्व पाहता, कलाक्षेत्राकडे 'सखोल' नजरेने पाहणे जवळपास दुरापास्त झाले आहे.  मी पाहिले आहे कित्येक ठिकाणी लोक अगदी पुतळ्यासारखे रीमोट कंट्रोल घेऊन बसतात टीव्हीसमोर, चित्रपट वा गाणी पाहात.... पण त्यातील एकही उत्सुकता दाखवित नाही की कोण असेल हा गायक, कुणी रचली असेल इतकी सुंदर रचना.... ‌सारे लक्ष एकतर त्या स्क्रीनवरील हिरविणीकडे तरी किंवा फॅशनकडे.

असो.... ]