देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश, सूर्य देतो

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे

..... बाप रे.... कित्येक वर्षांनी.... होय, कित्येक वर्षांनी शालेय अभ्यासक्रमातील ही एक प्रसिद्ध अशी कविता या शब्दगाणे कोड्याच्या निमित्ताने स्मरली... आणि स्मरले गीतकार ग. ह. पाटील देखील. आम्ही वर्गात सामुदायिकरित्या ही कविता अगदी किंचाळून म्हणत असू.... आमच्या आरडाओरड्याने त्या बिचाऱ्या चांदण्याही काळवंडून जात.