जाड प्लॅस्टीकचा कागद वाळवणाला वापरण्यासाठी मिळत असल्यास तो घ्यावा की.. त्यात मला प्रश्न आहे असे मी कुठे म्हटल्याचे मला स्मरत नाही. 

तुमच्या प्रतिसादातील 'मिळतो' या क्रियापदाचा अर्थ 'विकत मिळतो' असा असेल तर तो भाग माझ्यासाठीतरी महदाश्चर्याचाच म्हणावा लागेल. 

अवांतर :
आमच्या घरात मेणकापड मी आधीपासूनच बघत आलेय. (पावसाळ्यात घर गळायचे तेव्हा आई लोखंडी पलंगावर वरपासून खाली जमिनीपर्यंत लोळेल इतके मेणकापड घालून द्यायची आणि मग आम्ही पलंगाखाली जाऊन झोपायचो! ) त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत वाळवणं करायला तेच मेणकापड स्वच्छ धुवून वापरायची आम्हाला सवय आहे. अगदीच दुसऱ्या वाळवणात ते गुंतलेले असेल तर किराणा माल घेताना आलेल्या जाड प्लॅस्टीकच्या पिशव्या कापून, ते कागद आम्ही वापरतो.

अशा माझ्या अनुभवविश्वामुळे मी रोहिणीला दिलेल्या प्रतिसादामेणकापड वापरणे सुचवले इतकेच. मेणकापड म्हणजे कोणते कापड यात तिला सहजी समजेल म्हणून हॉस्पिटलमधील त्याच्या वापराचा उल्लेख केला, जो मला शेजारच्या एका आजींना अशातच पॅरालिसिसचा ऍटॅक आल्याने त्यांना भेटायला गेलो तेव्हा माहिती झाला म्हणून! असो.