ओहो.... वेदश्री,

चक्क 'मौज' सारख्या नामवंत प्रकाशन संस्थेकडून एका नामवंत लेखकाच्या पुस्तकाच्या नावाबाबत अशी गल्लत व्हावी यापरते दुसरे दुःख नाही.

माझ्याकडे त्या क्षणी 'धागे आडवेउभे' नव्हते, वाचले आहे जरूर. 'मौजे'चे अनिल अवचटांचेच 'आप्त' परवाच अक्षरधाराच्या प्रदर्शनात विकत घेतले होते. त्यात सुरुवातीच्याच पानावर "अनिल अवचट यांची पुस्तके"  या शीर्षकाखाली त्यांच्या पुस्तकांची यादी दिली आहे. त्यामध्ये क्रमांक १० वर असलेल्या पुस्तकाचे नाव छापले गेले आहे ~ "धागे उभेआडवे".... तोच धागा मी पकडून कोड्याचा शब्द तयार केला होता.

अर्थात तू दिलेल्या लिंकवर थेट त्या पुस्तकाचे कव्हरच उपलब्ध असल्याने वाद खुंटलाच. तरीही मौजकडून हे अपेक्षित नाही.

असो.... दंड माफ कर दिया ।