चक्क 'मौज' सारख्या नामवंत प्रकाशन संस्थेकडून एका नामवंत लेखकाच्या पुस्तकाच्या नावाबाबत अशी गल्लत व्हावी यापरते दुसरे दुःख नाही.
अगदी खरंय तुमचं म्हणणं. माझ्याकडे 'आप्त' तर नाही संग्रही पण मौजचे 'स्वतःविषयी' आणि मॅजेस्टीकचे 'कार्यरत' आहे तर त्यात अवचटांच्या पुस्तकांची यादी दिली आहे का बघितले तर मॅजेस्टीकने 'धागे आडवे उभे' लिहिलेय आणि मौजने 'धागे उभेआडवे'! हे पुस्तक वाचलेय मीदेखील पण नावात उभे-आडवे आहे की आडवे-उभे याबद्दल इतके लक्ष देणे मात्र या खेळामुळेच झाले. आता खरंच माझाही गोंधळ उडालाय. पुस्तक प्रत्यक्ष बघून नावाची खातरजमा करावीच लागेल असे दिसते.
दंड माफ कर दिया ।
जर्रानवाजी के लिए शुक्रिया, हुजूर!