बाकी तू म्हणतेस तसे " " अवतरण चिन्ह टाकले असते तर मग मजाच संपुष्टात आली असती.
नाही.. नाही.. उलट एकेरी अवतरणचिन्हांमुळे कोडे आणिकच क्लिष्ट झाले असते, जे झाले नाही म्हणून त्यातल्या त्यात बचावले मी, असे म्हणायचे होते मला.
शेवटी तू थकली नाहीस हे विशेष.
डोक्यात कोडेकिडा वळवळला की मग तहानभूक सगळी उडनछू होऊन जाते माझी. काही काही म्हणून करणे सुधरत नाही. त्यामुळे एक तर कोडे सोडवायचे किंवा सपशेल शरणागती मानून उत्तर जाणून घ्यायचे हे दोनच पर्याय गाठीशी उरतात. 'शरणागती मानतेस का.. बोल? ' असे मनाला विचारले की ते आणखीच चेकाळते आणि 'अजून प्रयत्न करून बघते.. थांब' म्हणते.. मग काय करणार? करावाच लागतो प्रयत्न..