चोरी करताना रंगे हाथ पकडले गेली असल्यासारखं वाटतंय..  

मजेचा भाग सोडून देता, अशात वाचायला मिळालेले आणि खूप आवडलेले असे हे पुस्तक आहे. प्रवाहाविरुद्ध पोहायचा प्रयत्न करणाऱ्या, राखीव जागेसारख्या हुकुमी वाटणाऱ्या जागेवर नोकरीला आलेल्या, एका सरकारी शाळेतील शिक्षकालादेखील किती प्रचंड त्रासाला सामोरे जायला लागू शकते याचे वास्तवाला धरून केलेले वर्णन आहे हे पुस्तक. संपादनाची बोंब असल्याने वाचायला त्रास होतो हे खरे पण तरीही मुख्य लिखाणात असलेले दाहक वास्तव, पुस्तक पुढे वाचायला भाग पाडल्याशिवाय राहत नाही.