वेदश्री...

राजकारणात सध्या 'तोडपाणी' शब्द भलताच लोकप्रिय होऊन बसला आहे... त्यामुळेच की काय वात्रटिकांचेही अमाप पीक आले आहे 'तोडपाणी' घेऊन.  त्या विषयी थोडेसे..... [थोडेसेच लिहितो.... नाहीतरी "गणुराया" ने तुझा मेंदू पातळ केलाच आहे... ]

सोसायटय़ांनी टॅक्स भरला नाही तर त्यांचे पाणी तोडले जाते, शेतकऱ्यांनी पैसे भरले नाही तर त्यांचे पाणी तोडले जाते त्यालाच तोडपाणी म्हणतात, असे समजले जात असे. परंतु मुंबईतील बिल्डरांशी तेथील नगरसेवकांनी संगनमत करून बांधकामाच्यावेळी जी भयानक वृक्षतोड  चालविली होती, तिला आळा घालण्यासाठी मग त्या सोसायटीचे पाणी तोडायचे असा काहीसा धाडसाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. 'एक झाड तोडले की दोन नवीन झाडे लावावीत' या अटीचे पालन न केल्यामुळेही तोडपाणी करतात.  या शब्दाबाबत इतिहासाचे तज्ज्ञ बाबासाहेब पुरंदरे म्हणतात, "शिवकाळात दीर्घकाळ लढाया चालत. किल्ल्यांमध्ये लपून बसलेल्या शत्रूंचे पाणी तोडून त्यास जेरीस आणण्याचे प्रयत्न होत त्याला तोडपाणी असे म्हणत. पाणी तोडले, की शत्रू शरण येऊन बोलणी करू लागे. तोंडचे पाणी पळविल्याने त्यांनी हार पत्करली’ या लांबलचक वाक्याचा संकोच होऊन कालौघात अखेर तह हा सुटसुटीत शब्द जन्माला आले."

अशी काहीशी कहाणी आहे तुझ्या तोडपाण्याची.