ठिक वाटली.
सतिशजी थोडेसे स्पष्ट बोलतो माफ करा पण सध्या काय होतय कळत नाही. काही महिन्यांपूर्वी तुमच्या गझल वाचताना जे जाणवायचे ते जाणवत नाहीये. तुमच्या पूर्वीच्या काही गझल वाचताना तोंडून नकळत व्वा ! निघायचे तसे आता होत नाही. गेल्या काही आठवड्यातील एखादा अपवाद वगळता बऱ्याचशा गझल साचेबद्ध वाटत आहेत. म्हणजे वृत्ताच्या दृष्टीने योग्य. यमक/अंत्ययमक अगदी गझलेच्या व्याकरणात बसणारे वगैरे वगैरे, थोडक्यात तंत्राच्या दृष्टीने १००% परंतु शेरांमध्ये विशेष काही जाणवत नाहीये.
याच गझलेचे उदाहरण द्यायचे झाल्यास
मतला - "मोडेन पण वाकणार नाही" हा वाकप्रचार वृत्तात बसवला आहे, बाकी त्यात विशेष असे काय आहे?
मीच माझ्या जिंदगीला द्यायचो खांदा....
भार प्रेताचा मला वाटायचा नाही! - या शेरात नक्की काय सांगायचे आहे? मला जाणवलेला अर्थ असा की स्वतःचे जीवन निरस, कंटाळवाणे वगैरे असावे व तसेच आयुष्य जगण्याला स्वतःच्या जिंदगीला खांदा देणे असे म्हटले असावे. व अशाच जगण्याची सवय असल्याने त्याचे फारसे काही वाटले नाही असे सांगायचे असावे पण मग हे उगीच जिंदगीला खांदा देणे/ स्वतःच्या प्रेताला खांदा देणे असे शब्दप्रयोग करून का सांगितलय? आणि यात भूतकाळ का आलाय? सध्या परिस्थिती बदलली आहे का? इ. इ. प्रश्न उपस्थित होतात.
अजून एक शेर जो विशेष वाटला नाही - आळोखेपिळोखे देत कोण उभी आहे? आणि हा शृंगार का सोसायचा नाही??
चक्काचूर आणि अत्याचार चांगले शेर आहेत नक्कीच.
वरील सर्व मतं माझी वैयक्तिक आहेत ( गझल साचेबद्ध वाटणे/ शेर विशेष न भावणे इ. इ. ) जे मनात आले ते बोललो राग नसावा