तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. मी हा शब्द या पुस्तकाच्या रूपाने पहिल्यांदाच वाचला आणि त्याचा अर्थ न समजूनदेखील पुस्तकातला मजकूर समजायला त्रास होत नव्हता म्हणून तशीच गाडी दामटवून घेतली. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार प्रकरणांमध्ये कुठेतरी का होईना पण प्रत्यक्ष 'पाणी' तोडण्याचा संबंध दिसतोय. या पुस्तकातील कथेत मात्र त्या शिक्षकाच्या एकूणच 'दाणापाण्यावर' गदा आणल्याचा प्रकार दिसतो. तुम्ही दिलेल्या माहितीमुळे पुस्तक पूर्णपणे समजता यायला मदत झाली, धन्यवाद.