मी मोर्चा नेला नाही, संपही केला नाही
मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होऊनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखील मज कुणी उचलले नाही

मी मोर्चा नेला नाही, संपही केला नाही
मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही

(माझे अत्यंत लाडक्या गाण्यांमधले एक. गाण्यातला उपरोधिकपणा प्रचंड भावलाय मला.)