ग्रेट.... संदिप खरेंच्या अनेक उत्तम रचनांपैकी ही एक. तू म्हणतेस तसा उपरोधिकपणा स्पष्टच आहे, किंबहुना कवितेचा तोच स्थायिभाव आहे.  विशेषतः
"मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही.... " इथल्या कांदा आणि आंब्याचे प्रयोजन तर अफलातूनच.

या रचनेवर जालावर ठिकठिकाणी खूप विडंबने झाल्याचे दिसून येईल.  पैकी एकदोन ओळी वानगीदाखल इथे देतो, जे मला आवडले होते....

मज जन्म मुलाचा मिळता, मी 'दामले' झालो असतो
मी असते जर का मुलगी, 'लाडांची कविता' असते.


असो....

मज सांग लक्ष्मणा, जाउं कुठें ?
पतिचरण पुन्हां मी पाहूं कुठें ?
कठोर झाली जेथें करुणा
गिळी तमिस्‍त्रा जेथे अरुणा