दिवसभर पावसात असून सांग ना आई
झाडाला खोकला कसा होत नाही?

रात्रभर पाढे म्हणून सांग ना आई
बेडकाचा आवाज कसा बसत नाही?