"वामन परत न आला".... "वामन परतुनी न आला"....
~ परत तोच खेळ ह्या थोर थोर प्रकाशकांचा, वेदश्री.
वामन केंद्रे यानी मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील 'प्रा. ' ची नोकरी स्वीकारली आणि मग ते नाट्यक्षेत्रातून गायबच झाले. त्यांच्या त्या वर्तनावर खुद्द गौरी नाराज होती. त्याला अनुलक्षून मग 'ललित' मध्येच भेंड्यांनी एक लेख लिहिला होता, त्यामध्ये एक वाक्य होते..... ".... प्रा. झाल्यानंतर केंद्रे यांची अवस्था वर्णन करायची तर आठवते जयंत नारळीकरांची कथा 'वामन परतुनी न आला'.
[इथे 'मनोगत' वर नैसर्गिक शुद्धलेखनाची सोय असल्याने मूळ नि चे रुपांतर आपोआप दीर्घ 'परतुनी' मध्ये होत असल्याचे दिसत आहे. ]
बुकगंगा साईटवर जाऊन मूळ कव्हर पाहिले.... तिथे 'वामन परत न आला' असे आहे मात्र.
असो.... मी प्रथम रे यांचा पथेर पांचाली पाहिला होता.... त्यानंतर खूप वर्षांनी पुस्तक वाचनात आले.... अर्थात तो पर्यंत पथेर [बंगाली 'पाथेर' असा उल्लेख करतात] चे पुढील चित्रपटरुपी भागही पाहून झालेच होते.
'पथेर पांचाली' चा अर्थ माहीत आहे ना ?
भाऊबीजी (? ) ~ शंका आहे मला.... पण या क्षणी तर हाच एक विकल्प दिसत्योय.