कवी स्वतः आपण काय केले ते सांगत नसून तिने काय केले ते सांगतोय

मी तसा विचार आधी केला होता; पण नंतर न पटून प्रथम पुरुषावर आलो.

... साठी 'कचरणे' का?


मला मिळालेल्या गाण्यात 'कतराए' असा शब्द होता... त्याप्रमाणे मी पुढे गेलो. आणखी शहानिशा करायला हवा होता असे दिसते.

... म्हणजे कोपलेली, राग आलेली, अप्रसन्न

हा हा   मला मिळालेल्या गाण्यात तेथे 'मलम' ह्या अर्थाचा शब्द होता.   मलाही ते चमत्कारिक वाटले होते; पण मी सारासार विचार (माझ्या परीने) करून फुंकर मारली आणि पुढे गेलो.   ही दुरुस्ती करावी लागेल असे वाटत आहे.

चटकन मनात आलेला बदलः (भरपूर स्वातंत्र्य घेऊन)

बनसी कधी रौरवही - होसी कधी मार्दवही
मधुशालमद्यवितरिके - अंगारही तू दंवही
मम पात्र रिक्तच उरले  ....


अद्याप पक्के झाले नाही. बदलण्याचीही शक्यता आहे.

"ऱ्हाले" खटकले. त्यापेक्षा 'उरले' चालले असते.

मान्य. तो पर्याय मनात आला होता, मात्र शेवटच्या क्षणी बदलला

मराठीतही 'हर' शब्द आहे, 'दर'ऐवजी तो चालला असता.

मान्य. पण दुसरा असताना तोच शब्द नको, असे वाटले. अर्थात पुढच्या भाषांतरांत ह्याचा विचार नक्की करीन.

"कल्पान्त" शब्दशः बरोबर असला तरी कवितेत त्याचा अर्थ जीवघेणा असा आहे.


बरोबर. आणखी एका गाण्यात तोच शब्द वापरायचे मनात आहे. बघुया कधी योग येतो ते.

तरी रिझवणे, समजूत घालणे, चित्तवृत्ती प्रफुल्लित करणे येत नाही असे कवी म्हणतो


हे मला उलटे वाटले. तिने हृदयभंग केल्यावर नायकाला रमणे अशक्य झाले आहे किंवा जमत नाही, असा (पुन्हा प्रथमपुरुषी) अर्थ घेतला.

अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहेच. अभिनंदन आणि धन्यवाद.
तुमच्यासारखे लोक रस घेऊन आणि पदरचा वेळ घालून मार्गदर्शन करत आहेत म्हणूनच भाषांतरात मजा आहे. असाच लोभ राहू द्या.
आणि हो, गाण्यांचा चांगला विसंबनीय स्रोत जालावर कोठे आहे? माझे स्रोत तितके विसंबनीय नसावेत असे वाटू लागले आहे