अज्ञातजी!
परखड वै.म. मांडल्याबद्दल धन्यवाद!
आमची काही वै.मते नोंदवतो....
१) वाक्प्रचारांचा उपयोग गझलेत करणे सौंदर्याचे लक्षण समजतात!
२) मीच माझ्या जिंदगीला द्यायचो खांदा!
भार प्रेताचा मला वाटायचा नाही!!
अज्ञातजी! आपण शेराचा फारच उथळ अर्थ पहाता बहुतेक!
शेरातील प्रत्येक शब्दाला/अक्षराला महत्व असते. अनावश्यक शब्दांना कामयाब शेरात जागाच नसते. कसे ते सांगतो.
थोडा विचार करा.........
खांदा देणे, जिंदगीला खांदा देणे, मीच माझ्या जिंदगीला खांदा द्यायचो(भूतकाळ), आता मला प्रेताचा भार वाटायचा नाही.......
या सर्व शब्दयोजना/प्रतिके यांचा समग्र विचार केलात का आपण?
खांदा देणे म्हटले, की प्रेताला खांदा देणे लगेच डोळ्यासमोर येते! म्हणून प्रेताची प्रतिमा अनिवार्य!
मीच माझ्या जिंदगीला खांदा द्यायचो, म्हणजे लौकिकार्थाने जेव्हा मी जिवंत होतो तेव्हाही मी प्रेतवतच होतो, जिला खांदा देण्याची आवश्यकता होती, पण कुणाचेही खांदे/हात मिळाले नाहीत. म्हणून माझेच जीवनरूपी प्रेत मी माझ्याच खांद्यावर घेवून मी जगलो.
आता भूतकाळ का वापरला?
कारण मी लौकिकार्थाने जिवंत होतो पण, माझी अवस्था प्रेतासारखीच होती, शिवाय कुणाचाही हात वा खांदे न मिळाल्यामुळे मलाच माझी प्रेतवत जिंदगी वाहून न्यावी लागली!
आता तर मी खरोखरचा मेलो आहे हे पहिल्या ओळीतील भूतकाळ व दुसऱ्या ओळीतील वर्तमानकाळावरून सूचीत केले आहे जे सहृदयी रसिकाच्या लक्षात यावे!
जिवंतपणी स्वत:च्या जिंदगीचे प्रेत स्वत:च्या खांद्यावरून वाहून नेण्याची सवय झाल्याने आता मी प्रत्यक्ष मेल्यावर देखिल माझ्या खऱ्याखुऱ्या प्रेतास मीच स्वत: खांदा देताना मला तो भार वाटणार नाही असे आम्ही म्हणतो!
आता मीच मेलो, तर मी कसे काय खांदा देणार बुवा मला/प्रेताला? असा गद्य/अकाव्यात्मक बालिश प्रश्न कुणी विचारू शकतो, ज्यांना शेरातील काव्य सांगणे केवळ अशक्य आहे!
आळोखेपिळोखे देत कोण उभी आहे? आणि हा शृंगार का सोसायचा नाही?? <<<<<<<<,,
हे आपले प्रश्नही तसेच हास्यास्पद वाटतात! सगळेच सांगायचे मग गद्यच लिहावे ना, काव्याचा, त्यात पुन्हा गझलेचाच/शेराचाच अट्टहास कशासाठी?
आता विचारलेच म्हणून सांगतो...........
इथे आमच्या प्रेयसीचे वर्णन केले आहे जी इथे अव्यक्त आहे!
कुठलीही स्त्री उठल्या उठल्या अत्यंत नैसर्गिक अवतारात, जेव्हा कुठलाही नट्टापट्टा केलेला नसतो तेव्हा सुंदरच दिसते!
त्यातून आळोखेपिळोखे देताना व्यक्ती कोण काय बोलेल याची तमा न बाळगता स्वत:च्या पूर्ण कायेला शिथिल करते, तेव्हा तर स्त्री ही अतिशय मोहक दिसते, जणू आळस देतानाचे ते तिचे नैसर्गिक सौंदर्यच तेव्हा उतू जात असते! म्हणून या आळोखेपिळोखे देण्याला/आळस देण्याला/अंगडाईला एक प्रकारचा नैसर्गिक शृंगारच आहे असे संबोधले! हा शृंगार इतका कातिल दिसतो की, ते बघणाऱ्याला कदाचित सोसवणारच नाही एखदेवेळी!
शेरांमध्ये विशेष काही जाणवत नाहीये.<<<<<<<<<
विशेष काही जाणवणे/न जाणवणे हे जसे शायरावर अवलंबून असते तसेच ते वाचकांची साहित्यिक पोच, सौंदर्य/काव्यबोध/पोषण यावरही अवलंबून असते!
थांबतो!
............प्रा.सतीश देवपूरकर