प्रेमात पडतो जो तो येता जाता
पण सावरलो तुझा होता होता
हे वेड आहे ना
पण गोड आहे ना
ही ओढ आहे जी
ती गोड आहे ना
तर मग शानाना ना ना ना ...
या गालांवर ही अधीर लाली
ओठांवर येण्या का आतुर झाली
मानेवर नक्षी हळुवार नखांची
ही गोड वेदना, तुझी आठवण झाली
नसेल ती उद्या
पण आज आहे ना
तर मग शानाना ना ना ना...