१. ( मोडेन पण वाकणार नाही" हा वाकप्रचार वृत्तात बसवला आहे, बाकी त्यात विशेष असे काय आहे?) =
= वाक्प्रचारांचा उपयोग गझलेत करणे सौंदर्याचे लक्षण समजतात!
वाक्प्रचारांचा उपयोग गझलेत करणे याबद्दल बोलत नसून वाक्प्रचारालाच शेर म्हणून मांडणे याबद्दल बोलत आहे. या दोन गोष्टींमध्ये फरक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
२. मीच माझ्या जिंदगीला द्यायचो खांदा....
भार प्रेताचा मला वाटायचा नाही!
( मला जाणवलेला अर्थ असा की स्वतःचे जीवन निरस, कंटाळवाणे वगैरे असावे व तसेच
आयुष्य जगण्याला स्वतःच्या जिंदगीला खांदा देणे असे म्हटले असावे....... ) =
अज्ञातजी! आपण शेराचा फारच उथळ अर्थ पहाता बहुतेक!
मीच माझ्या जिंदगीला खांदा द्यायचो, म्हणजे लौकिकार्थाने जेव्हा मी जिवंत
होतो तेव्हाही मी प्रेतवतच होतो, जिला खांदा देण्याची आवश्यकता होती, पण
कुणाचेही खांदे/हात मिळाले नाहीत. म्हणून माझेच जीवनरूपी प्रेत मी माझ्याच
खांद्यावर घेवून मी जगलो......
आपल्या प्रतिसादावरून वाटत आहे की माझी समज फारशी भयाण नसावी. किंवा बहुधा आपल्या दोघांना जाणवलेले अर्थ कमी अधिक फरकाने उथळ असावेत.
३. देत आळोखेपिळोखे ती उभी आहे!
हा तिचा शृंगार तुज सोसायचा नाही!!
( आळोखेपिळोखे देत कोण उभी आहे? आणि हा शृंगार का सोसायचा नाही?? ) =
= इथे आमच्या प्रेयसीचे वर्णन केले आहे जी इथे अव्यक्त आहे!
कुठलीही स्त्री उठल्या उठल्या अत्यंत नैसर्गिक अवतारात, जेव्हा कुठलाही नट्टापट्टा केलेला नसतो तेव्हा सुंदरच दिसते!
त्यातून
आळोखेपिळोखे देताना व्यक्ती कोण काय बोलेल याची तमा न बाळगता स्वत:च्या
पूर्ण कायेला शिथिल करते, तेव्हा तर स्त्री ही अतिशय मोहक दिसते, जणू आळस
देतानाचे ते तिचे नैसर्गिक सौंदर्यच तेव्हा उतू जात असते! म्हणून या
आळोखेपिळोखे देण्याला/आळस देण्याला/अंगडाईला एक प्रकारचा नैसर्गिक शृंगारच
आहे असे संबोधले!
यात शेरातील दुसऱ्या ओळीचा अर्थ ( जो प्रभावी समारोप असावयास हवा ) = हा शृंगार इतका कातिल दिसतो की, ते बघणार्याला कदाचित
सोसवणारच नाही एखदेवेळी!
कदाचित म्हणजे ????
असो. !
४. आपल्या प्रतिसादातून काही - शेरातील प्रत्येक शब्दाला/अक्षराला महत्व असते. अनावश्यक शब्दांना कामयाब शेरात जागाच नसते.
अगदी योग्य बोललात परंतु अनावश्यक शब्द वापरले नाहीयेत म्हणून एखादा शेर कामयाब आहे हे लॉजिक अजिबात पटत नाही. अर्थात हेही माझे वैयक्तिक मतं
५. विशेष काही जाणवणे/न जाणवणे हे जसे शायरावर अवलंबून असते तसेच ते वाचकांची
साहित्यिक पोच, सौंदर्य/काव्यबोध/पोषण यावरही अवलंबून असते!
या वाक्यातील पूर्वाध व उत्तरार्ध दोन्हींशी १००% सहमत.