गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या?
का गं गंगा यमुनाही या मिळाल्या?
उभयपितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला?
...
...
विभा विमला आपटे प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रिची तशा सजुनी येती
रेशमाची पोलकी छिटे लेती
तुला 'लंकेच्या पार्वती'समान
पाहुनीया होवोनी समाधान
काय त्यातिल बोलली एक कोण
'अहा! आली ही पाहा भिकारीण!'