डोळ्यांवरून माझ्या उतरून रात्र गेली
वचने मला दिलेली विसरून रात्र गेली 

डोळ्यांत जन्म सारा, दाटून डोह झाला
अश्रूंत चंद्र माझ्या विखरून रात्र गेली