"भाषांतरातले काही शब्द फारच जड वाटताहेत.... नाही का? "
उदाः
"मधुशालमद्यवितरिके"
"मादकनयनमधुले"
भाषांतरातल्या शब्दांचा सोपेपणा मूळ गाण्यातल्या शब्दांच्या सोपेपणाशी मिळताजुळता ठेवण्याचा, कमीजास्त न होऊ देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो
. पण तुमची सूचना विचार करण्यासारखी आहे.
"हृद्भंग करुनी जाणे"----च्या ऐवजी "हे हृदय तोडुनी जाणे... " असे साध्या रीतीने म्हणता येईल....
दोन मुद्दे.
भाषांतरात रंग, ढंग, भंग, अंग अशी शब्दांची गंमत साधलेली आहे ती तुम्हाला जाणवली असेलच.
शिवाय गागाऽलगागागागा ह्या मात्रांमध्ये तुमची ओळ बसत नाही, हेही तुम्हाला जाणवेल असे वाटते.
मनोगती सदस्य पदरचा वेळ देऊन आपणहोऊन वेगवेगळ्या सूचना आपुलकीने करतात म्हणूनच भाषांतर करण्यात आनंद आहे एवढे मात्र खरे.
असाच लोभ असू द्यावा. धन्यवाद.