मोरो केशव दामले लिखित 'शास्त्रीय मराठी व्याकरण' हे पुस्तक प्रकाशित होऊन नुकतेच शतक उलटले. व्याकरणाच्या अभ्यासकांना ह्याचा लाभ होईल असे वाटते. जालावर एकदोन ठिकाणी हे पुस्तक उपलब्ध आहे. त्याच्याच आधारे ही आवृत्ती बनवून वाचनास उपलब्ध केलेली आहे.

सध्या येथे दिसणारी अवस्था 'पूर्वप्राथमिक' (किंवा त्याही आधीची) म्हणावी लागेल.

सध्या हे पुस्तक येथे केवळ वाचनसुलभ आहे एवढेच. पुस्तकाची पाने यांत्रिक छाननी करून तयार केलेल्या चित्रप्रतिमांच्या स्वरूपात असल्याने ती क्रमाने एकापुढे एक वाचत जाणे ह्याला पर्याय राहत नाही. त्यात अधिकाधिक वापरसुलभता आणि वावरसुलभता कशी आणता येईल ह्यावर विचार चालू आहे. वाचकांचे प्रतिसाद, जालावर मिळणाऱ्या सुविधा, सुचणाऱ्या नव्यानव्या कल्पना ह्यांच्या आधारे जालावरच्या एखाद्या पृष्ठाइतकी वावरसुलभता कशी आणता येईल, ह्याकडे प्रशासनाचे लक्ष आहे, आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.

ह्यातल्या त्रुटी, अडचणी, सुचवणी ह्याखाली प्रतिसादाचे स्वरूपात मांडाव्यात.