बहुधा पुरस्कार नाकारणारे कलाकार/ खेळाडू इ. जेव्हा 'मला अमुक एक पुरस्कार मिळायला हवा होता' असे म्हणतात, तेव्हा त्यामागे आपल्यापेक्षा अननुभवी/ कमी दर्जाच्या/ डाव्या कलाकाराला तो पुरस्कार आधी मिळाल्याने (किंवा त्यापेक्षा मोठा पुरस्कार दिला गेल्याने) येणारी नाराजी व्यक्त होत असते.
नाराजीमागची पार्श्वभूमी नीट समजून घेतली, तर 'पुरस्कार देउन माझा अपमान केला' असा अन्वयार्थ का लावला जातो हे लक्षात येते. त्यामुळे 'नित्याची नाराजी' टाळता येईल असे वाटत नाही. असो.