काय सांगू मी देवाची मात
झाला महार पंढरीनाथ...
नेसला मळीन चिंधोटी
घेतली हातामधी काठी
घोंगडी टाकली पाठी
करी जोहार दरबारात
झाला महार पंढरीनाथ...