कुलुपाचे आणि किल्ल्यांचे किस्से आवडले, रोहिणी. मजा आली वाचून! तुमची लिहिण्याची शैलीही आवडली. उरलेले किस्से लिहा, जमतील तसे.  

अभियांत्रिकी शिकताना आम्ही ८-१० मुली एकत्र रहात असू. तेव्हा सुरुवातीला असल्या काही घोळाने प्रत्येकी एक अशा बऱ्याच किल्ल्या होत्या तरी, एकदा कुलूप कापावे लागले. त्यानंतर एकीने आकड्यांचे कुलुप आणले. त्यामुळे किल्ली केवळ आठवणीत. (तो क्रम अजूनही लक्षात आहे!)