"...त्यामागे आपल्यापेक्षा अननुभवी/ कमी दर्जाच्या/ डाव्या कलाकाराला तो
पुरस्कार आधी मिळाल्याने (किंवा त्यापेक्षा मोठा पुरस्कार दिला गेल्याने)
येणारी नाराजी व्यक्त होत असते.... "
~ असे घडते हे मान्य. पण त्याला 'सीलेक्शन कमिटी' तरी काय करेल ? कमिटीचे काम फक्त त्यांच्या समोर देशातून विविध संस्थाकडून आलेल्या 'शिफारसी' वर निर्णय घेणे इतपतच जबाबदारी असल्याने एखाद्या वर्षात 'अ' चे नाव दिसत्ये, पण त्याच्यापेक्षा हरेक बाबतीत ज्येष्ठ असलेल्या 'ब' चे नाव कसे नाही ? हा प्रश्नही ते विचारू शकत नाहीत ही खरेतर दुर्दैवाची बाब.
या अशा अडचणीमुळेच जवळपास ५० वर्षे संगीतसेवा केलेल्या सुमन कल्याणपूर यांचे नाव आजही पद्म पुरस्काराच्या यादीत येत नाही तर अशाच सेवेची पंधरावीस वर्षे पूर्ण केलेल्या कविता कृष्णमूर्तीला मात्र तो मिळून जातो.
सुधा मल्होत्रा.... आज वय ७६.... आजच्या पिढीतील किती चित्रपटप्रेमींना हे नाव माहीत असेल? समितीपुढे यंदा हे नाव आले 'पद्मश्री' साठी. सुधाताईंच्या स्वभावातील विनय असा की त्यानी एका शब्दानेही प्रतिक्रियेत 'टू लेट वा अन्याय' चे प्रयोजन केलेले नाही.