सावित्री जगदाळे बाई, तुमची 'शाश्वत' किंवा ' श्वासवत' (तुम्ही चुकून 'श्वाश्वत' लिहिले असावे)  ही कवितासुद्धा जब्बरदस्त आहे. (म्हणजे चांगली आहे.) ती स्वतंत्र द्यावी. (म्हणजे प्रतिसादात नको.)

तुमचे तीन काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेत म्हणजे तुम्ही 'प्रथितयश' कवियत्री आहात. येथे मनोगतावर नव्यानेच आलेल्या दिसता. तुमच्या तीन काव्यसंग्रहातील सर्व कविता एकेक करून येथे देण्याची कृपा करावी.

या कविता संग्रहांची नावे काय आहेत?, त्यांच्या किंमती किती आहेत?  आणि ते कोणत्या प्रकाशकाने प्रकाशित केले आहेत? हे कळल्यास खरेदी करण्याचा विचार करता येईल. व्यक्तीगत निरोप पाठवलात तरी चालेल.