जुनी मुद्रित पुस्तके यांत्रिक छाननीने चित्रस्वरूपात उपलब्ध झालेली असतात. त्यातले प्रत्येक 'पृष्ठ' खरे म्हणजे एक चित्रप्रतिमा असते. जालावर इतरत्र दिसणारा मजकूर (उदा वर्ड वेब) शब्द, अक्षरे अशा स्वरूपात असतो. अशा मजकुरातून एखादा 'शब्द' शोधणे एखाद्या चित्रातून शब्द शोधण्याहून कितीतरी सोपे जाते. चित्रातून शब्द शोधण्यासाठी त्या चित्रातली अक्षरे ओळखून काढणारी 'प्रकाशीय अक्षरओळख' सुविधा लागते. अशी सुविधा इंग्रजी/रोमन अक्षरांसाठी विकसित झालेली आहे आणि मराठी/देवनागरी अक्षरांसाठी विकसनाच्या मार्गावर तिची घोडदौड चालू आहे. तिच्यात सुधारणेला बराच वाव आहे. (असे प्रशासनाने केलेल्या अत्यंत मर्यादित निरीक्षणावरून आणि अभ्यासावरून म्हणावेसे वाटते. चू. भू. द्या. घ्या.)
तरीही अशा चित्रस्वरूपातल्या पुस्तकातून कशाकशाप्रकारे शोध घेता येईल ह्याची पडताळणी चालू आहे. तुम्ही हे व्याकरणाचे पुस्तक (किंवा जालावरची इतर चित्रस्वरूपातील पुस्तके) वाचताना कशा कशाचा शोध घ्यावासा वाटतो ते कळवलेत तर त्या दृष्टीने विचार करता येईल.
तुमच्या स्वारस्याबद्दल धन्यवाद.