काका, बरोबर आहे तुमचे म्हणणे, की "काश" साठी वाक्य वापरता येईल. पण माझा आधीचा प्रतिसाद पाहा. तुम्ही दिलेल्या उदाहरणांत तो दुःखाचा "उसासा" नाहीये. मला वाटतयं तो उसासा म्हणजे "काश" चा "क्रक्स" आहे.
काश, काश जैसा कोई शब्द मराठी में होता.
काश सारखा एखादा शब्द मराठीत असता तर किती छान झाले असते, पण तो नाही आहे हेही आलेच.
काश, अभी तुम यहाँ होती.
तू आता इथे असतीस तर किती छान झाले असते, पण अरेरे, तू नाही आहेस.
काश, हमारी दोस्ती का तुम ऐसा मतलब नहीं निकालते.
आपल्या मैत्रीचा असा अर्थ तू न घेतास तर बरे होते, पण तू घेतलास. (काका, ही दोन वाक्ये सहजच निवडली की....? ;)
ऐ काश के हम होश मे अब आने ना पाये.
आता भानावर येऊच नये असे वाटते, पण ते शक्य नाही हे ही कळतयं. (होश=भान, चांगला शब्द निवडला, मी आपले "शुद्धीवर" म्हणालो होतो :p)
काश, पृथ्वीराज घौरी को छोड न देता.
पृथ्वीराज घौरीस न सोडता तर किती बरे होते. (...किती बरे झाले असते.) पण अरेरे, त्याने सोडले त्याला.
काश मुझे जो केहना है, मै आपको समझा पाता ;)
~(नासमझ) शशांक