लय भारी टगवंतराव तुम्ही एकदम आमच्या स्वैपाकघरातच शिरलात की राव.
(हवे तर हे आगाऊ च्यालेंज समजा यानंतरच्या तिसऱ्या कोड्यासाठी, काय म्हणता? )
हा हा. तुमचे बरोबर आहे हां.
मागच्या वेळेला तुम्ही भाषांतर मूळ चालीत करा म्हणून किल्ली मारली होती ना, तेव्हा पासून डोके अस्वस्थ होते. हे गाणे सुद्धा यमके जुळवायला अवघड म्हणून जवळ जवळ सोडूनच दिले होते. पण
स्थिरता ना पाया माझ्या
सावर मज राया माझ्या
हे यमक जुळले आणि म्हटले आता हे गाणे जुळवायचेच. असो.
तुमच्या यादीतले एक गाणे डोक्यात आहेच ... पण इतक्यात नाही. बघू या योग कधी येतो ते.

अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहेच. अभिनंदन आणि धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.