अत्यंत आवडते फळ. पण आतून लाल असलेले बनारसी पेरू मात्र अजिबात आवडत नाहीत. पोपटी हिरवा अर्धा पिकलेला पेरू खाण्यात मजा. पेरूची कोशिंबीर, सरबत, वड्या सर्व आवडते. पिकलेल्या पेरूची कोशिंबीर फारच आवडती. सध्या पुण्यात पेरू, अंजीर, चिकू(जी एकेकाळी मुंबईची मक्तेदारी होती) बाजारात चांगले आणि पुष्कळ आले आहेत. आणि होय, दात असेपर्यंत पेरू खाऊन घ्यावेत हे खरेच.