ओह !! 'तोत्तोचान.... ' इतके अप्रतिम पुस्तक. प्रेमातच पडलो होतो मी या पुस्तकाच्या.
नॅशनल बूक ट्रस्टने तर केवळ ५० रुपयात उपलब्ध करून दिलेले हे पुस्तक
मी किमान ८-१० मुलामुलींना वाढदिवसाची भेट म्हणून दिले आहे.... अजूनही देत असतो.

मला वाटते मराठी आंतरजालीय संसारात या पुस्तकावर नित्यनेमाने चर्चा झडत असतातच.

"धाकटे आकाश" - बरोबर.... मनोहर शहाणे या लेखकाची साठच्या दशकातील ही कादंबरी. त्यांची गाजलेली म्हणावी अशी म्हणजे 'पुत्र'. वाचली नसल्यास जरूर मिळवून वाचावी अशी मी मुद्दाम शिफारस करीत आहे.

उत्तर :

माणसे अरभाट आणि चिल्लर.

नवीन :
अंका एश्वात चेरसा