राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले
- छान.
जयश्रीताई,
"आयुष्य राजयोगी" म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ते नीटसे कळले नाही. योगविद्येचा जो एक प्रकार असतो , त्यात आयुष्य गेले, सुखोपभोग घेताच आले नाहीत, असे म्हणायचे आहे का? तसे असल्यास नेमका राजयोगच का? किंबहुना, कर्मयोग अधिक चपखल बसेल. तुम्हाला अभिप्रेत अर्थ सांगाल का? (प्रामाणिक प्रश्न; खोच, टोमणा वगैरे काही नाही).
"सुलगावता" ही हिंदी उधारी कशाला? 'शिलगावता' आहे की मराठीत.