व्याकरण टिचकीसरशी हवे!!

आता ह्या पुस्तकाची पाने टिचकी मारून उघडता येण्याजोगी करण्यात काही प्रमाणात यश मिळालेले आहे.

पाने म्हणजे चित्रे आहेत त्यामुळे त्यावर टिचकी मारून काहीही उपयोग होणार नाही ह्याची कल्पना आहे.

पानांवर इतर पानांचे आणि इतर तपशिलाच्या क्रमांकाचे उल्लेख आहेत तेथे तेथे ते उल्लेख टिचकी मारण्यासारखे करणे आता शक्य झाले आहे. तपशिलाच्या अशा दुव्यावर टिचकी मारली की तपशिलाचे ते पान तो तपशील असेल त्या ओळीपाशी उघडेल अशी (जवळ जवळ एखाद्या एचटीएमेल पानाप्रमाणे) व्यवस्था करता आलेली आहे. तपशिलाचे दुवे तपकिरी चौकटीत तर पानांचे दुवे हिरव्या चौकटीत दिसतील. नमुन्यासाठी पदपरिस्फोट ह्या प्रकरणातील हे पान पाहावे. शिवाय ऊहापोहाच्या सूचीच्या पानांवर अशी अनेक उदाहरणे पाहता येतील.

पण महत्त्वाच्या पानांचे दुवे दिलेत तर तेथे पटकन जाता येईल असे मी सुचवते. उदा. अनुक्रमणिका, सूची

अनुक्रमणिकेचे आणि तपशीलांच्या सूचीच्या पानांचे दुवे दर पानाच्या वर दिलेले आहेत. शिवाय दर पानाच्या खाली एखाद्या मुद्रित पानावर किंवा एखादा ऊहापोहाचा तपशील असलेल्या पानावर जाण्यासाठी मसुद्याची सुविधा दिलेली आहे.

हे सर्व वापरत असताना जाणवणाऱ्या त्रुटी, अडचणी आणि सुचवणी येथे मांडाव्यात. विशेषतः अनेक पानांमध्ये मजकुरात मिसळलेले तपशिलाचे आणि पानांचे उल्लेख आहेत ते शोधण्याचे काम वेळेच्या उपलब्धतेनुसार सुरूच राहील. मात्र एखाद्या पानावर एखादा तपशीलाचा दुवा हवा आहे असे कुणी सुचवल्यास त्याचा प्राधान्याने विचार करणे शक्य होईल असे वाटते.

आपल्या स्वारस्याबद्दल धन्यवाद.