नाचत ना गगनात, नाथा
तारांची बरसात, नाथा
आणित होती माणिकमोती
वरतुनि राजस रात, नाथा।

आता हे तर तुमचे गडकरी... 'राज'मान्य. बिहारी नव्हेत, चांगले सीकेपी.* आता यांनी वापरलाय, म्हटल्यावर तरी 'बरसात' मराठीत वापरलेला चालून जायला हवा, नाही का?


तळटीपा:

* ही वाक्ये साधारणतः, "आता हा तुझा विश्वंभरकाका... सख्खा चुलतभाऊ माझा. मुसलमान नव्हे, चांगला ब्राह्मण. पण घातलेनीतच ना रत्नांग्रीतले वहिवाटीचे घर आपल्या घशात!"** या चालीवर वाचावीत.

** संदर्भ: 'असा मी असामी', पु.ल. देशपांडे. उद्धरणातील नेमक्या शब्दयोजनेची चूभूद्याघ्या***.

*** (किंवा, 'जनरीत पाळलेली आहे' असे हवे तर खुशाल समजावे. )