आजानुकर्ण,
सोडवण्याचा अल्गोरिदमच लक्षात आला की आपोआप सुटत जाते
.
तुम्हाला जो अल्गोरिदम सुचला आहे तो सर्व रचनांना (configurations) लागू पडेल असे तुम्हाला वाटते का? 'विस्कटावे' म्हटल्यावर किंवा हा 'नोड' उघडल्यावर प्रत्येक वेळी वेगळी रचना दिसते. ती रँडमली निवडलेली असते
असा माझा अंदाज आहे. (याबद्दल प्रशासकांनाच विचारले पाहिजे. )  तसे असेल तर ह्या रचनांची संख्या प्रचंड (अनंत नसली तरी) असणार व  त्यापैकी काहींची इच्छित पुनर्रचना कदाचित होणारही नाही. 
अर्थात माझे हे वाटणे केवळ वाटणे आहे. त्याला फारसा तार्किक किंवा गणितीय आधार नाही. ह्या विषयावर चर्चा व्हावी असे मला वाटते. म्हणजे त्यातून माझ्यासह सर्वांनाच काही शिकायला मिळेल.