इयत्ता सातवीच्या मानाने लेखन सरस वाटले.  सातवीच्या मानाने 'संलग्न' हा शब्द आत्मविश्वासाने मराठी वाक्यात वापरणे फारच आवडले. थोडे निटपिकिंग म्हणजे प्रमाणलेखनात एकारान्त शब्द (असे, सभागृहे वगैरे) वापरावेत असे अनेक माहीतगारांनी/तज्ञांनी म्हटल्याचे मी इथे आणि इतरत्र वाचले आहे.  त्यामागची कारणमीमांसा मला पटते. त्यामुळे अनुस्वारान्त रुपे (असं, सभागृहं) शक्यतो टाळावीत असे वाटते. (बऱ्याच ठिकाणी ते योग्य प्रकारे वापरलेही आहे उदा. अधिवेशने) ( विंग हा शब्द आता मराठीत बराच रुळला आहे (विंगेत वगैरे) त्यामुळे त्याचे अनेकवचन मराठीच्या नियमानुसार (विंगां...असे)  करता यावे. की ही विंग (नाटकातली वगैरे) आणि इमारतीची विंग (इमारतीचा एक छोटासा घटक याअर्थी) यामध्ये सूक्ष्म फरक आहे? )