आजानुकर्ण,
माझा 'मराठी' शीर्षकाचा प्रतिसाद वाचला असेलच.
त्याचे सामान्यीकरण करण्याच्या दृष्टीने मला तुमची मदत हवी आहे.
आता ह्याच कोड्यात म रा ठी अ से आ म ची मा य बो ली ज री आ ज ती रा ज्य भा षा न से । ह्यात फक्त बो आणि ली यांची (किंवा शेजारशेजारच्या कोणत्याही दोन अक्षरांची) अदलाबदल करून हे कोडे सोडवता येते का ते पाहावे व काय होते ते कळवावे ही विनंती.
मला कोडे सोडवण्याची युक्ती अवगत नाही आणि प्रयत्न-प्रमाद पद्धतीने करण्यासाठी लागणारी चिकाटी पण माझ्याजवळ नाही म्हणून तुम्हाला तसदी देत आहे.
आगाऊ (आगाऊपणे नाही!) धन्यवाद.
-मीरा