सोडविलेले कोडे इथे उत्तर म्हणून पोस्ट करतेवेळी लोप पावले आणि तो मूळचा अव्यवस्थित शब्दांचा चौकोन पुन्हा समोर आला.
कोडे पूर्ण झाले की पुढच्या पायरीला ते विस्कटले जाणे हे बहुधा मूळ संहितेत संकल्पिल्याप्रमाणेच घडत असावे त्यामुळे ही तांत्रिक 'अडचण' किंवा चूक वाटत नाही... मात्र वापरकर्त्याला हा अनुभव फारसा सुखावह/सोयीस्कर वाटत नसावा असे दिसते, त्यामुळे ह्यात सुधारणा करण्याकडे लक्ष द्यावे लागेल असे वाटते.
पाठपुराव्याबद्दल धन्यवाद.