आपला लेख वाचला. माणसं सुशिक्षित कसली फक्त शिक्षित आहेत अस मला वाटतं. माणसांच्या वाईट सवयी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत
असं दिसतं. रस्त्यावर अचकट विचकट बोलणं, बोलण्यात मार्दव नसणं (म्हणजे साध्या बोलण्यातही) , शिव्यांचा सर्रास होणारा वापर, रस्त्यात
थुंकण्याच्या सवयी, दारूच्या दुकानातच दारू पिणं, आवश्यकता असेल तेव्हा काढता पाय घेणं, सार्वजनिक वाहनांमध्ये कसंतरी बसणं, गरणू माणसाला जागा न देणं (लोकल , बस वगैरे) सार्वजनिक ठिकाणी उलटे सुलटे व्यायाम करून लक्ष वेधून घेणं , तसेच जोडीने वेगवेगळे चाळे करीत बसणं ज्याने इतरांची पाहण्याची पंचाईत व्हावी, इत्यादी अनेक सवयी माणसं फ़क्त शिक्षित असल्याचं दाखवतात. पण सुशिक्षित नाहीत. उच्चशिक्षित तर मुळीच नाही.