प्रा. माधव त्रि. पटवर्धन अर्थात कविवर्य श्री माधव जूलियन् लिखित छन्दोरचना हे पुस्तक जालावर एकाहून अधिक ठिकाणी उतरवून घेण्यासाठी ठेवलेले आहेच. अशाच ठिकाणांची पाहणी करून प्रशासनाने हे पुस्तक मनोगताद्वारे उपलब्ध करून दिलेले आहे. मात्र अशा यांत्रिक छाननी केलेल्या पुस्तकाचा उपयोग पुष्कळसा ओळीने पाने वाचण्यापुरताच होतो असे लक्षात आल्यामुळे अशा पुस्तकाची वापर/वावरसुलभता कशी वाढवता येईल यावर प्रशासनाने विचार करून काही युक्त्या योजलेल्या आहेत. उदा. सूचीच्या एखाद्या पानावरून मूळ स्पष्टीकरणापाशी जायला आता ओळीने पाने उलगडायची आवश्यकता राहणार नाही. त्याऐवजी अशा पानावर आरेखलेल्या चौकटीत टिचकी मारून ते ते पान त्या त्या ओळीपाशी उघडले जाईल अशी योजना करता आलेली आहे.
ह्याहून इतर ठिकाणी असणाऱ्या मजकुरात जर असे आणखी दुवे द्यायची आवश्यकता वाटली आणि अभ्यासकांनी अशा त्रुटी निदर्शनास आणून दिल्या तर तेही देता येतील.
अर्थात नेहमीप्रमाणेच अधिक सुधारणा सातत्याने सुरू आहेतच.
धन्यवाद.