'मनोगत' परिवाराने घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमीच.
तसे पाहिले गेल्यास    दुर्मिळ अशी पुस्तके वाचकास उपलब्ध होतात या निमित्ताने त्याचेच अप्रुप फार असल्याने वाचन
आणि वावर सुलभता काहीशी किचकट वाटली तरी पुस्तकाचे मोल लक्षात घेता तो त्रास [? ] सुसह्यच म्हटला पाहिजे.

एक किरकोळ सूचना : माधवराव पटवर्धन आपले टोपणनाव नेहमी 'माधव जूलियन् ' असेच छापले जावे या विषयी आग्रही असत असा श्री. के. क्षीरसागर यानी माधवरावांवरील त्यांच्या लेखात उल्लेख केल्याचे [अंधुक] स्मरते. माझ्या संग्रही असलेल्या "विरहतरंग" आणि 'सुधारक' ह्या दोन्ही पुस्तकावर 'माधव जूलियन् ' अशी नावाची
रचना आहे.
प्रशासक यानी  वरील प्रतिसादात 'माधव ज्यूलियन' असा केलेला उल्लेख 'भाषा' नियम पालनच्या नजरेतून, त्यामुळे, काहीसा वेगळा भासतो ..... [चुकीचा म्हणत नाही]