छान लेखन, काही ठिकाणी फार म्हणजे फारच भारी वाटलं !!
तिथे जवळ पास ३ तास पुरतील एवढी लोक आणि समोर एक सूचना वजा फलक. "मराठी भाषेत एका वाक्यात जास्तीत जास्त किती चुका आपण करू शकतो?" अश्या स्पर्धे मधूनच त्या फलकाची निर्मिती झाली असावी. सुमारे तब्बल तीन तास तोच फलक वाचून वाचून मी इतका पकलो -- घेतलाय मी सुद्धा हा अनुभव ! डोंबिवली फास्ट सारखे वागावेसे वाटते मध्येच !!
भाची ने तिची शाळेचा "घ. अ." म्हणून -- किती छान वाटले घ.अ. वाचुन.. माझा नेहमीच अपूर्ण चा शेरा होता
घरातून निघताना तो बहुतेक " भीमरूपी महारुद्रा" वाचूनच आला असावा. आणि त्यातले " गतीशी तुलना नसे" हेच वाक्य लक्षात ठेवून तो वायू वेगाने गाडी हाकत होता. -- माझ्या मागे बसणारा मला देखिल हमझास विचारतो -> आधी अँबुलन्स वर होतास का रे ?
उंदीर मामांच्या हातातील भलामोठा लाडू -- अर्जंट मिळायला हवा
पुलेशु.
आशुतोष दीक्षित.