ह्या स्वरुपाची कोडी मी ज्या प्रकारे सोडवतो त्या पद्धतीच्या काही पायऱ्या नोंदीकृत करण्याचा मी प्रयत्न करत आहे. मात्र मी नोंदीकृत करण्याचे मनात ठेवले की पुढची पायरी सुचणे अवघड जात आहे असे दिसते. याउलट केवळ खेळण्याच्या उद्देशाने एकदा सोडवावयास घेतले की एक लय लागून ते सुटत जाते. हा एक विचित्र अनुभव गेले काही दिवस येत आहे. :( खरे म्हणजे या युक्तीत लपवण्यासारखे काही आहे असे नाही. मात्र एकदा नोंद करता आली की मी येथे देण्याचा प्रयत्न करतो.