शीर्षकातले पाठदुखी आणि तिकोना हे शब्द आणि सुरुवातीचा ट्रेकिंगचा फज्जा वाचून वाटले होते की 'ट्रेकिंगमुळे पाठदुखी होऊन पाठीची त्रिकोनी कमान झाली त्याची गोष्ट' असे काही विनोदी वर्णन असेल. तसे काही नसले आणि हा ट्रेक वेगळ्याच वळणाने गेला असला तरी आवडला. लहान मुलांचे हुकूम पाळण्यातला तुमचा संयम(मला पेशन्स म्हणावयाचे आहे) वाखाणण्याजोगा आहे. हाडशीचा मंदिरपरिसर मन:शांती देणारा आहे खरा. बरोबर थोडी फेस पावडर आणि कंगवा घेऊन गेला असतात तर मंदिराच्या पार्श्वभूमीवर (मंदिर बुटके करून)' दाखवायचा फोटो'ही काढता आला असता. त्यामुळे समोरील बाजूला आपल्या श्रद्धाळूपणाची साक्ष पटून 'आहे, मुलगा वळणातला आहे' असा प्राथमिक अभिप्राय/अहवालही मिळाला असता.
फोटो आवडले हे वेसांनल.