तिकडे मिळतो की नाही ते माहीत नाही. इथे पाहिला तेव्हा ही भाजी करून पाहिली. छान चव आली. अरूगुला हे इथे सॅलड साठी वापरतात, पण मी त्याची भाजी करून पाहिली. सेलेरीची पण करून पाहिली पीठ पेरून, छान लागली. मी खूप भाजी प्रिय आहे, त्यातून पालेभाज्या खूपच आवडतात. तुम्ही लिहिलेल्या भाज्यांपैकी चंदनबटवा नाव ऐकले आहे, पण कधी पाहिली नाही त्यामुळे केली नाही. टाकळा हे नाव पहिल्यांदाच ऐकत आहे. तुम्ही पण भाजीप्रेमी दिसत आहात
पालक शेपू मिक्स पण छान लागते. प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद ! मोहरी आणि सुरणाचा पाला कधी पाहिल्या नाहीत. तुम्हालाही भाज्या आवडतात हे वाचून खूप छान वाटले. देशस्थांमध्ये भाज्या खूप करतात असे माझे निरिक्षण आहे. माझ्या बऱ्याच मैत्रिणींकडे करताना पाहिल्या आहेत.