छान आहे .. शिवाय खालील दोन पंक्ति

जायचे होते मलाही रक्त माझे द्यायला!
पोसण्यासाठीच जळवा लागले थांबायला!!

येथे लागले च्या एवजी लागल्या हवे होते का ?

मी दगड होतो, विनाकारण न मूर्ती जाहलो!
घाव टाकीचे किती मज लागले सोसायला!!

अशी एक म्हण आहे 'टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही'
आपली विनाकारण न मुर्ती जाहलो म्हणजे दगडच राहिलो असा अर्थ होतो का?
तसे असेल तर घाव टाकीचे किती मज लागले सोसायला!! चा संदर्भ लागत नाही.

असो हे मला जसे आकलन जाहले ते लिहले आहे . चु. भु. द्द्या̱. घ्या.

राजेंद्र देवी