धन्यवाद राजेंद्रदेवीजी!
मला गरजूंना रक्त देण्यासाठी जायचे होते पण या जळवांच माझे रक्त शोषित बसल्या आहेत माझे! जणू त्यांच्यासा्ठीच मला येथे थांबायला लागले आहे असा शेराचा मथितार्थ आहे!
मी दगड होतो, पण असा दगड होतो, ज्यात एक सुंदर मूर्ती दडलेली होती! पण ती मूर्ती काही उगाचच वा विनाकारण आकाराला नाही आली, तर मला टाकीचे किती तरी घाव सोसायला लागले त्यासाठी! हा शेराचा शब्दिक अर्थ आहे!
लाक्षणिक अर्थ असा आहे की, प्रत्येकात काही तरी चांगले दडलेले असते! जे व्यक्त होवू शकते जर कष्ट, घाव सोसण्याची तयारी असेल तर!
..........प्रा.सतीश देवपूरकर