मला वाटतं त्या ओळी अशा आहेतः

"हर हसीं चीज का मैं तलबगार हूं"
" रस्ता, फूलोंका, गीतोंका बीमार हूं"

माझ्या मते,
हिंदी भाषेत, "का बीमार होना" चा अर्थ "चे प्रचंड वेड असणे" असा होतो.
म्हणजे कवीला असे म्हणावयाचे आहे, की ,
"मला रस्त्यांचे, फुलांचे आणि गाण्यांचे प्रचंड वेड आहे. "
थोडक्यात, मला निसर्गाचे प्रचंड वेड आहे. मी निसर्गाचा अन निसर्ग माझा आहे......

अवांतरः
ह्या गाण्यात, गाणे सुरू होण्यापूर्वीचे संगीत नीट ऐका. एक-एक वाद्य वाढवत नेले आहे.
म्हणजे, पहिल्यांदा संतूर, मग संतूर आणि आणखी एक वाद्य, पुढे, ती दोन आणि अजून एक वाद्य......
ऐकायला अत्यंत छान वाटतं. हॅटस ऑफ टू रविंद्र जैन.