अतिशय समयोचित म्हणावा असा डॉ. अनुपमा कुलकर्णी यांच्या कर्तबगारीचा आणि प्रगतीचा आलेख आवडला. आपल्या समाजात विज्ञानक्षेत्रातील स्त्रीच काय पण पुरुष देखील उपेक्षेचे शिकार बनल्याचा इतिहास आहे.... डॉ‍. जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर असे काही अपवाद वगळता..... अशा उदास वातावरणात डॉ. अनुपमा कुलकर्णी यांच्याविषयी वाचताना सर्वांना अभिमान वाटलाच पाहिजे. दुर्दैवाने जालीय दुनियेतील सुशिक्षितांनीही ह्या आगळ्या मिळकतीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. असो.

अर्थात टीव्ही आणि सिनेवाल्यांना मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या तुलनेचा मुद्दा इथे गैरलागू होईल. त्याना मिळणारी प्रसिद्धी ही अत्यंत तकलादू अल्पजिवी आणि बिनकिमतीचीही असते. काल लाखोंच्या तोंडी असणारे 'ममता कुलकर्णी' हे नाव स्टुडिओबाहेर तंबाखू मळत बसलेल्या वॉचमनलाही आज माहीत नाही.... पण 'अनुपमा कुलकर्णी' हे नाव आज दहाजणाना जर माहीत असेल तर ते त्यांच्या मनी कायम वास्तव्य केले जाईल.

[काहीसे अवांतर : धागाकर्ते श्री. नरेंद्र गोळे यानी लेखात एके ठिकाणी ".... डॉ.अनुपमा पद्मनाभ कुलकर्णी ह्या स्त्री अभियंतीचीही ... " असे म्हटले आहे. ही वाक्यरचना चुकीची आहे. "स्त्री अभियंती" म्हणजे काय ? शिवाय 'अभियंता' या पदाचे स्त्रीलिंगी रुप अभियंता असेच होते. जसे "प्रोफेसर" चे स्त्री रुप "प्रोफेसर" असे केले जाते, 'प्रोफेसरीण' असे लिहिले जात नाही..... 'डॉक्टरीण अनुपमा कुलकर्णी' असे आपण लिहित नाही, तर मग 'अभियंता' ला 'अभियंती' करण्यात काय हशील ?]